‘वक्फ’च्या वैधतेला आव्हान देणारे दहा अर्ज   

तातडीने सुनावणीस नकार

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे दहा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. काँग्रेस, द्रमुक आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने काल अर्ज दाखल केले.सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार, न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर हे अर्ज सुनावणीस आहेत. दरम्यान, या अर्जांवर तातडीने सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला.काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आधीच वक्फच्या विधेयकास आव्हान देणार असल्याचे म्हटले होते.

Related Articles